Showing posts with label INDIAN HISTORY. Show all posts
Showing posts with label INDIAN HISTORY. Show all posts

Friday, December 7, 2018

स्वतंत्र भारत


                       
दुसरे महायुद्ध १९४५ साली समाप्त झाले. या युद्धात इंग्लंडला विजय मिळाला. त्यात इंग्लंडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला राष्ट्रव्यापी लढा, क्रांतिकारकांनी केलेल्या सशस्त्र चळवळी, आझाद हिंद सेनेने दिलेला सशस्त्र लढा या घटनांमुळे भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा होऊ लागला. म्हणून भारताचा कारभार भारतीयांच्या हाती सोपवण्याचे ब्रिटिशांनी ठरवले त्यासाठी त्यांनी भारतीय नेत्यांशी बोलणी सुरू केली.

१८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला. या कायद्याने भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली.  १५ ऑगस्ट १९४७ हा भारताला स्वातंत्र्य देण्याचा दिवस ठरला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर दिल्ली येथे ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक हा  ध्वज खाली उतरवण्यात आला आणि त्या जागी स्वतंत्र भारताचा तिरंगी  ध्वज फडकावण्यात आला. ब्रिटिशांच्या दास्यातून भारत स्वतंत्र झाला. अनि लक्षावधी भारतीयांच्या असीम त्यागाची ही फलश्रुती होती. या ऐतिहासिक प्रसंगाच्या वेळी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणात म्हणाले, “अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार  केला होता. आज त्याची पूर्ती.... ब-याच अंशाने आपण करत आहोत. मध्यरात्रीच्या शांत वेळी सारे जग झोपले असताना भारत स्वातंत्र्याच्या नव्या युगात जन्म घेत आहे.

 संस्थानी प्रजेचा मुक्तिलढा :- भारत स्वतंत्र झाला, तरीही भारतीय  जनतेचा स्वातंत्र्यलढा संपला नव्हता. ब्रिटिश राजवटीत अनेक लहानमोठी  संस्थाने होती. काही संस्थानिक आपल्या प्रजेवर अन्याय ही संस्थानिक आपल्या प्रजवर अन्याय, जुलुम करत  असत. त्याविरुद्ध संस्थानी प्रजेने चळवळ सुरू केली होती. संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन व्हावीत, अशी संस्थानी प्रजेची इच्छा होती. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची कणखर भूमिका व मुत्सद्देगिरी यांमुळे बहुतेक संस्थाने भारतात विलीन झाली. पाकिस्तानच्या फौजांनी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली.
 सरदार वल्लभभाई पटेल

त्या वेळी काश्मीर भारतात विलीन  झाले. जुनागढच्या प्रजेने भारतात  विलीन होण्याचा निर्णय घेतला.

हैदराबाद मुक्तिलढा :- हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. या संस्थानच्या संस्थानिकाला निजाम असे म्हणत. त्याने प्रजेवर अत्याचार केले. निजामाच्या अनियंत्रित राजवटीविरुद्ध प्रजेने प्रखर  लढा दिला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी नेहरू रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ  इत्यादींनी केले. हैदराबाद स्टेट  काँग्रेस' या संघटनेच्या वतीने चळवळ  सुरू करण्यात आली. त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. आशाताई  वाघमारे, सुशीलाबाई दिवाण, कावेरीबाई बोधनकर, सरस्वती बोरीकर  इत्यादी स्त्रियांचाही या लढ्यात
स्वामी रामानंद तीर्थ

सहभाग होता. संस्थानी प्रजेने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे. अशी मागणी केली, परंतु निजाम आपले संस्थान स्वतंत्र ठेवावे, अशा विचाराचा होता. स्वतंत्र भारत सरकारला त्याने उद्दामपणे आव्हान दिले. त्या वेळी भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. संस्थानी प्रजेने दिलेला लढा यशस्वी झाला.

फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण :- भारतातील ब्रिटिश सत्तेचा शेवट झाला, तरी भारताचे काही भाग अद्यापही  विदेशी सत्तांच्या ताब्यात होते. चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे, याणम या प्रदेशांवर फ्रान्सची सत्ता होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फ्रेंच सरकारने भारत सरकारशी बोलणी केली व आपल्या ताब्यातील प्रदेश भारताच्या स्वाधीन केले.

गोवा मुक्तिलढा :-  गोवा, दीव व दमण, दादरा आणि नगर हवेली या पदेशांबर पोर्तुगिजांची सत्ता होती. तो प्रदेश मुक्त करण्यासाठी भारतीय जनतेला लढा दयावा लागला. या लढ्यात डॉ. टी. बी. कुन्हा हे  आघाडीवर होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आणण्यासाठी निकराचे प्रयत्न करण्यात आले. गोवा मुक्तिलढ्यात डॉ. राममनोहर लोहिया, नानासाहेब गोरे, हिरवेगुरुजी, सेनापती बापट, मधु लिमये, सुधीर फडके, मोहन रानडे, सुधाताई जोशी, सिंधुताई देशपांडे इत्यादी नेते आघाडीवर होते. 
   डॉ. टी. बी. कुन्हा

महाराष्ट्रातून गोवा मुक्ती समितीच्या अनेक सत्याग्रहींची पथके गोव्यात शिरली. पोर्तुगिजांनी त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्याग्रहींनी आपला लढा चालूच ठेवला. अखेरीस भारतीय लष्कराने १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला.

 आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा हा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. हा संग्राम जुलुम व अन्यायाविरुद्ध होता. पाश्चात्त्य साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त होण्यसाठी होता आपल्या  स्वातंत्र्यलढ्याने जगातील   अनेक देशांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा  दिली  आपली मातृभमी परकीयांच्या वर्चस्वापासून स्वतंत्र करण्यासाठी अनेक देशबांधवांनी त्याग केला. स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा आणि स्त्रीपुरुष समानतेचा अनमोल वारसा आपल्याला स्वातंत्र्यलढ्यातून मिळाला आहे. तो जतन करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.



आझाद हिंद सेना


                               
दुस-या महायुद्धामुळे इंग्लंडची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. तेथील जनताही युद्धाला त्रासली होती. त्यामुळे इंग्लंड अडचणीत आले होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रीय सभेने ब्रिटिशविरोधी सशस्त्र आंदोलन सुरू करावे, असा प्रचार सुभाषचंद्र बोस यांनी केला. त्यामुळे ब्रिटिश सरकार धास्तावून गेले. सरकारने सुभाषचंद्र बोस यांना अटक करून कारागृहात डांबले. तेथे त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुढे त्यांना कोलकत्यातील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले, तथापि सुभाषचंद्र बोस वेशांतर करून ब्रिटिशांच्या पहा-यातून शिताफीने निसटले व जर्मनीची राजधानी बर्लिन येथे गेले.


 नेताजी सुभाषचंद्र बोस
 भारताच्या स्वातंत्र्यासाठी जर्मन सरकारची मदत मिळावी म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी प्रयत्न केले. त्यांनी युरोपमधील भारतीय जनतेला संघटित करण्याचा प्रयत्न केला. बर्लिन येथे आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले. या केंद्रावरून वेळोवेळी केलेल्या भाषणांत त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले.

आझाद हिंद सेना :- भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस हे त्या काळात जपानमध्ये राहत होते. जपानने सिंगापुर, मलेशिया, म्यानमार इत्यादी प्रदेश ब्रिटिशांकडून जिंकन घेतले होते. त्या प्रदेशांतील भारतीय  लोकांची एक संघटना बांधून रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापन केला होता. जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची त्यांनी 'आझाद हिंद सेना' स्थापन केली. तिचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी सुभाषबाबूंना निमंत्रण पाठवले. सुभाषचंद्र बोस जर्मनीहून हजारो किलोमीटरचा खडतर सागरी प्रवास करून टोकियोला आले. त्यांनी तेथे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

 रासबिहारी बोस
    
आझाद हिंद सेनेत त्यांनी झाशीची राणी' या नावाने स्त्रियांचे एक पथक स्थापन केले. या पथकाचे नेतृत्व डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे होते. या पथकात जानकी थिवी, बेला दत्त इत्यादी स्त्रिया सहभागी होत्या.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली 'आझाद हिंद सरकार स्थापन झाले. या सरकारला जपान, जर्मनी, इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली. अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सरकारने तेथे तिरंगा फडकावला.अदमानला शहीद व निकोबारला  ‘स्वराज्य' अशी नावे दिली.

डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन

चलो दिल्ली :- भारत स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेने सिंगापूरहून  आगेकूच केले. चलो दिल्ली' अशी घोषणा देत आझाद हिंद सेना  भाताकडे निघाली. आराकान व कोहिमा या प्रदेशांत प्रवेश करताना लष्कराशी तिने निकाराचा लढा दिला. पुढे मोहीम चालवणे अशक्य झाले . मुसळधार पाऊस सुरू झाला. जपानची मदत मिळणेही कठीण झाले.

या अडचणीमुळे  आझाद हिंद सेनेने माघार घेतली.१८ ऑगस्ट १९४५ रोजी.
सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना आझाद हिंद सेनेचे अधिकारी पकडले गेले. लष्करी न्यायालयाने या अधिका-यांना दोषी ठरवन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, पण ब्रिटिश सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने झाली. शेवटी जनतेचा प्रक्षोभ पाहून शिक्षा रद्द करण्यात आल्या.

 नौसैनिकांचा उठाव :- आझाद हिंद सेनेचा प्रभाव भारतीय नौसैनिकांवर व वायुसैनिकांवरही पडला. ब्रिटिशांची नोकरी करण्यापेक्षा आपणही मातृभूमीसाठी त्यांच्याविरुद्ध उठाव करावा, असे त्यांना वाटू लागले.

मुंबई बंदरात उभ्या असलेल्या तलवार' या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला. त्यांनी नौकेवरील युनियन जॅक' हा ब्रिटिशांचा ध्वज खाली उतरवला आणि तिरंगा फडकावला.

 दिल्ली, लाहोर, अंबाला, मेरठ येथील वायुसैनिकही संपावर गेले. उठाव करणार  सैनिकांनी कामावर ताबडतोब परतावे, अन्यथा त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा आदेश सरकारने काढला, परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ब्रिटिशविरोधी उठाव चालूच राहिले. ठिकठिकाणी सामान्य जनतेचाही पाठिंबा त्यांना मिळाला.

नौसेनेचा उठाव  भारतीय लष्कर हा भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेचा मुख्य पाया होता तो पायाच आता खिळखिळा होऊ लागला. त्यामुळे भारतात आपलं सत्ता फार काळ टिकणे अवघड आहे, याची जाणीव ब्रिटिशांना झाली.


आझाद हिंद सेना -
  • आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते - ‘विश्वास-एकता-बलिदान'.

  •   युद्धघोषणा होती - ‘चलो दिल्ली '

  •   निशाण होते - चरख्याचे चित्र असलेला तिरंगी झेंडा.

  •   बोधचिन्ह होते - झेप घेणारा वाघ


  •  मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र होता - जय हिंद '



चले जाव आंदोलन


                     
दुसरे महायुदध १९३९ साली सुरू झाले. ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या इच्छेविरुदध भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात गोवले. याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रीय सभेने वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर अनेक सत्याग्रही आंदोलनात सहभागी झाले. युद्धासाठी भारतीयांचे संपूर्ण सहकार्य ब्रिटिशांना पाहिजे होते. भारतात राष्ट्रीय सरकारची स्थापना केल्याशिवाय .अशा प्रकारचे संपूर्ण सहकार्य देण्याचे राष्ट्रीय सभेने नाकारले. ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेची ही मागणी धुडकावून लावली. त्यामुळे भारतात ब्रिटिशविरोधी वातावरण पसरले.


  आचार्य विनोबा भावे
 मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या अधिवेशनाते चले जाव' चा ठराव मांडला. राष्ट्रीय सभेने ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढ्याचे रणशिंग फुकले. या अधिवेशनात जनतेसमोर भाषण करताना करेंगे या मरेंगे' असा संदेश देऊन गांधीजी म्हणाले, की या क्षणापासून भारतीयांनी स्वतःला स्वतंत्र समजावे. स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एक तर आपण यश मिळवू अथवा हे प्रयत्न करत असताना बलिदान तरी देऊ. “चले जाव' चा ठराव राष्ट्रीय सभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला. गांधीजींच्या भाषणाने भारतीय जनता भारावून जाऊन स्वातंत्र्याच्या अखेरच्या लढ्यासाठी तयार झाली.

चले जाव' आंदोलन :- आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते दडपून टाकण्यास सरकार सज्ज झाले. ९ ऑगस्टच्या पहाटे महात्मा गांधी, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी प्रमुख नेत्यांना कारागृहात डांबण्यात आले. 'चले जाव' आंदोलनाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी देशभर शेकडो कार्यकर्त्यांना  अटक करण्यात आली. प्रमुख नेते गजाआड गेले, की आदोलन सौम्य होईल, अशी सरकारची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली.

मौलाना आझाद

प्रमुख नेत्यांना अटक केल्यामुळे देशभर सरकारविरुद्ध प्रखर जनआंदोलन सुरू झाले. सर्वत्र सभा घेण्यात आल्या, मोर्चे निघाले, हरताळ पुकारला गेला. निदर्शने करण्यात आली. ब्रिटिशांनी भारत सोडून चालते व्हावे, अशी सर्वत्र मागणी करण्यात आली.  या आंदोलनात महिला, विद्यार्थी, शेतकरी, दलित, आदिवासी, कामगार इत्यादींचा समावेश होता. नंदुरबार येथे शाळकरी मुलांनी तिरंगा घेऊन मिरवणूक काढली. 'चले जाव'च्या घोषणा दिल्या. मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात शिरीषकुमार, लालदास, धनसुखलाल, घनश्याम आणि शशीधर हे विद्यार्थी ठार झाले. देशात ठिकठिकाणी पोलीस व जनता यांच्यात अक्षरशः रणकंदन सुरू झाले. शेतकरी आणि आदिवासी ब्रिटिशांना प्रखर विरोध करण्यास कचरले नाहीत. त्यांनी ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या पोलीस कचेऱ्यावर  ताबा मिळवला आणि तेथील शस्त्रे हस्तगत केली. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांच्या प्रेरणेने यावली, चिमूर, आष्टी येथे जनतेने प्रचंड आंदोलने केली.

 शासकीय कार्यालये, शाळा-महाविदयालये ओस पडली. शाळकरी मुलामुलींनीही मिरवणुका काढल्या. त्यात 'वंदे मातरम्', 'भारत माता की जय' अशा घोषणा सर्वत्र निनादत होत्या. ब्रिटिश सरकारला राज्यकारभार करणे आता अशक्य झाले. सरकारने नेत्यांची धरपकड केली.

भूमिगत चळवळ :- याच सुमारास काही नेत्यांनी भूमिगत राहून  सरकारविरोधी चळवळ संघटित केली. जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, सुचेता कृपलानी, सानेगुरुजी, एस. एम. जोशी इत्यादींचा त्यात समावेश होता. त्यांनी तरुणांची पथके उभारली. गुप्तपणे पत्रके छापणे, आकाशवाणी केंद्र चालवणे, दूरध्वनीच्या तारा कापणे इत्यादी कामे या पथकांनी केली. ही भूमिगत चळवळ अगदी खेडोपाडी पोहोचली.
 
जयप्रकाश नारायण
            
  उषा मेहता
   
 अरुणा असफअली


मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी उषा मेहता यांनी घेतली. अरुणा असफअली यांनी भूमिगत राहून आंदोलनाचे नेतृत्व केले.

की ब्रिटिश अधिकारी तिकडे जायला घाबरू लागले. ‘करेंगे या मरेंगे या निर्धाराने भारतीयांनी आंदोलन निर्भयपणे चालवले. जनतेच्या मनातील ब्रिटिशांबद्दलची भीती नाहीशी झाली.

प्रतिसरकार :-  या काळात भारतात काही प्रांतांमध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. जनतेने तेथील कारभार आपल्या हाती घेतला. त्यांनी जमीन महसूल गोळा केला, पंचायत नेमून न्यायनिवाडा केला. जनतेची प्रतिसरकारे स्थापण  केली. अशा प्रकारची प्रतिसरकारे बंगालमध्ये मिदनापुर, बिहारमध्ये पूर्णिया, महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झाली.

महाराष्ट्रात सातारा येथे स्थापन झालेले प्रतिसरकार वैशिष्ट्यपूर्ण ठरले. या प्रतिसरकारचे प्रेरणास्थान क्रांतिसिंह नाना पाटील हे होते. त्यांनी आपल्या भागातील ब्रिटिश अधिका-यांना हुसकावून लावले आणि स्वतंत्र यंत्रणा उभारली.  या प्रतिसरकारांनी आपापल्या प्रांतांमध्ये एवढा दरारा निर्माण केला, की ब्रिटिश अधिकारी तिकडे जायला घाबरू लागले. ‘करेंगे या मरेंगे या निर्धाराने भारतीयांनी आंदोलन निर्भयपणे चालवले. जनतेच्या मनातील ब्रिटिशांबद्दलची भीती नाहीशी झाली.
 

क्रांतिसिंह नाना पाटील



Featured post

क्रांतियुग

समाजजीवनाच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात , अशा बदलांना क्रांती ...