आज युरोपखंड अनेक क्षेत्रात
आघाडीवर
आहे. पण मध्ययुगीन
युरोपातील समाज मागासलेल्या अवस्थेत होता. समाजावर धर्मगुरूनचा प्रभाव होता.ते जे
सांगतील ते लोकांना मान्य करावे लागे. धर्मगुरूंची प्रवचने हे लोकांचे न्यान
मिळवण्याचे प्रमुख साधन होते. धर्मगुरु प्रमाणे राजघराण्यातील लोक व सरदार, उमराव यांनाही समाजात
महत्वाचे स्थान
असे.
प्रबोधन :- युरोपातील ही स्थिती हळूहळू बदलू लागली, कारण युरोपात पुढील काळात वैचारिक जागृती घडून आली. धर्मगुरू, सरदार, उमराव याच्याइतकेच सामान्य माणसाच्या भावभावनांनाही महत्त्व आहे. तसेच प्रत्येक माणसाला एक व्यक्ती म्हणून मूल्य आहे ही जाणीव झाली.बुद्धीला पटेल तेच मान्य करावे, हा विचार लोकांना समजला. या वैचारिक जागुतीला प्रभोधन असे म्हणतात.
विविध कारणामुळे युरोपात प्रबोधन घडून
आले.
छपाई यंत्राचा शोध :- इ.
स १४५०
च्या
सुमारास छपाई यंत्राचा लागला. तोपर्यंत हस्तलिखित पुस्तकेच होती. ती सर्वांना
वाचायला मिळने
शक्य नव्हते. शिवाय ती
लॅटिन किवा ग्रीक भाषेत असत.
सर्वसामान्य लोकाना
या
भाषा समजत नसत. छापण्याच्या कलेमुळे लोकांच्या भाषेत लिहिले पुस्तके अनेक
लोकांना वाचता येण्याची सोय झाली.
नवे साहित्य नवे
विचार :-
स्वत:च्या
बुद्धीवर विश्वास ठेवा,केवळ इतर कोणी सांगतो
म्हणून त्यावर विसंबून राहू नका, असे रॉजर बेकनने सांगितले.
रॉजर बेकन |
कला क्षेत्रातील बदल :- चित्रकला, मूर्तिकला या क्षेत्रांतही नव्या
प्रकारच्या विषयांचे चित्रण केले गेले. लिओनार्डो-द-व्हिन्सी याने ‘मोनालिसा' या चित्रात एका
तरुणीच्या चेह-यावरील हास्याचे अप्रतिम चित्रण केले आहे. यापूर्वीच्या काळात
सामान्य माणूस चित्रकलेचा विषयच होऊ शकत नव्हता, फक्त धर्मकथांवर
आधारलेलीच चित्रे काढली जात.
विज्ञानातील प्रगती :- कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले यांसारख्या
खगोलशास्त्रज्ञांच्या शोधांमुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. सूर्य
पृथ्वीभोवती फिरतो,
ग्रहणे
आणि धूमकेतू हे आपल्यावर संकटे आणतात इत्यादी समज पूर्णपणे खोटे आहेत, हे माणसाला समजले.
प्रयोगशीलतेवर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे खगोलशास्त्राप्रमाणेच पदार्थ
विज्ञान, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी
विषयांतही अनेक नवे शोध लागण्यास सुरुवात झाली.
भौगोलिक शोध :- लांबचा
प्रवास करू शकतील अशी जहाजे तयार करण्याचे ज्ञान प्रबोधन युगात प्राप्त झाले. अचूक
नकाशे बनवण्याचे शास्त्रही अवगत झाले. होकायंत्राची माहिती झाली. या प्रगतीमुळे
नवे भूप्रदेश शोधण्याच्या चळवळीला युरोपात चालना मिळाली.
मोनालिसा
|
आशियातून युरोपकडे जाण्याचा एकच व्यापारी मार्ग तोपर्यंत माहीत
होता. हा खुष्कीचा मार्ग कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजे आताचे इस्तंबूल या.. शहरातून जात
होता. खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग, इ. स. १४५३ मध्ये
तुर्की लोकांनी हे शहर रोमन सम्राटाकडून जिंकून घेतले. त्यामुळे नवे मार्ग
शोधण्याची गरज निर्माण झाली. नौकानयन शास्त्रातील प्रगतीमुळे युरोपातील अनेक धाडसी
खलाश्यांनी जगातील नवे प्रदेश शोधून काढण्याच्या मोहिमा हाती घेतल्या. कोलंबस, अमेरिगों व्हेस्पुसी, वास्को-द-गामा, फर्डिनंड मॅगेलन
इत्यादी खलाश्यांचा त्यांत समावेश होतो. या मोहिमांमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला.
भारत व पूर्वेकडील अन्य देशांकडे जाण्याचे नवे सागरी मार्ग माहीत झाले.
धर्मसुधारणा चळवळ :- प्रबोधनामुळे
धर्मगुरूंच्या व पोपच्या अधिकारांना आव्हान मिळाले. हस, इरॉस्मस, मार्टिन ल्यूथर
यांसारख्या विचारवंतांनी धर्मगुरूच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नयेत, अशी शिकवण दिली, बायबल हा धर्मग्रंथ
वाचून लोक स्वतःच धर्माज्ञांचा अर्थ लावू शकतात, त्यासाठी धर्मगुरूची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे
व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचारांचे वारे
युरोपात वाहू लागले. आधुनिक काळात युरोपात घडून आलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय
बदलांची सुरुवात प्रबोधन युगात झाली.
मार्टिन ल्यूथर |
No comments:
Post a Comment