Monday, November 26, 2018

प्रस्तावना


 


भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत  महाराष्ट्राचे स्थान अत्यंत  महत्वपूर्ण  आहे. भारतीय संस्कृतीचा जडणघडनित महाराष्ट्रने भर घातली आहे. जगप्रसिद्ध असलेली  अजिंठा लेणी, भाजे, काले, जुन्नर  वेरूळ लेणी, बिबीका मकबरा देवगिरी  किल्ला व गुरुद्वारा ही ऐतिहासिक स्थळे महाराष्ट्रातच आहेत. मराठी आणि मुस्लिम राजवटीच्या काळात महाराष्ट्र चा  विकास झाला. इ.स. १८१८ मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया सत्ता स्थापन झाली. इ.स. १८५८ मध्ये कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश संसदेची सत्ता झाली. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रात बदल घडून आले. ब्रिटिशांच्या विचारानी भारावलेल्या अनेक समाज व धर्मसुधारकांनी समाज आणि धर्म सुधारणा करण्याचे कार्य हाती  घेतले. यामध्ये जगन्नाथ सेठ, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ लाड, महात्मा जोतिराव फुले , महादेव  रानडे, गोपाळ आगरकर, विठ्ठल शिंदे, महर्षी धों. के. कर्वे व राजर्षी शाहू महाराज यांचा समावेश होतो. सुरूवातीला रामोशी, भिल्ल, कोळी यांनी इंग्रजाना विरोध केला. यानंतर इ.स. १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 


काँग्रेसने सुरुवातीस सरकारला सहकार्य केले; परंतु नंतर मात्र काँग्रेसनेच स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व केले. या शिवाय महाराष्ट्रात क्रांतिकारी चळवळही चालू होती. इ.स. १९४७ मध्ये भारत देश स्वतंत्र झाला. 

महाराष्ट्रात ब्राम्नोतर, दलित, शेतकरी व कामगार चळवळीही झाल्या.राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भास्करराव जाधव, बाबूराव जेधे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर व नारायण लोखंडे यांनी या चळवळीचे नेतृत्व केले. हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळसुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासात उल्लेखनीय ठरते. प्रस्तुत ग्रंथात  महाराष्ट्राचा सर्वांगीण इतिहास देण्याचा प्रयत्न केला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

क्रांतियुग

समाजजीवनाच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात , अशा बदलांना क्रांती ...