१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्र राज्याला प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा मिळाला आहे .या राज्यावर सातवाहन, वाकाटक , बदामीचे चालुक्य घराणे, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव ,शिलाहार ,मुस्लीम आणि मरठी राज्यकर्तयनी राज्य केले. महाराष्ट्रच्या जडणघडनित आणि सामाजिक संस्कृतीक विकासात या राज्यघराण्याचे योगदान उल्लेखनीय ठरते. त्याचाच आढावा प्रस्तुत प्रकरणात घेतला आहे.
भौगोलिक स्थान स्थिती :-
भारतीय संघराज्यात २९ घटकराज्ये व ७ केद्रशासीत प्रदेश आहेत. २ जुन २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याच्या विभाजनातून तेलंगणा है - २९ वे राज्य निर्माण झाले. २९ घटक राज्यापैकीच महाराष्ट्र हे एक घटकराज्य आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग महाराष्ट्र पठार म्हणजेच दख्खन पठार आहे. महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे .
या राज्याचा सर्वसाधारण भौगोलिक आकार त्रिकोणाकृती असून दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद होत गेलेला आहे. त्याचा पाया कोकणात आणि त्याचे निमुळते टोक पूर्वेस गोंदियाकडे आहे. हे राज्य १५° ४४ ते २२° ०६° उत्तर अक्षांश आणि ७२° ३६ ते ८०° ५४' पूर्व रेखांश पसरले आहे.
क्षेत्रफळ व लोकसंख्या :-
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे, ३५८ तालुके, ३७८ नगरे व ४३,७११ खेडी आहेत. महाराष्ट्र या राज्याचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.कि.मी. ने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९.३६ टक्के आहे. या राज्याची पूर्व - पश्चिम लांबी ८०० कि. मी. तर उत्तर - दक्षिण लांबी ७२० आहे. या राज्यास ७२० कि. मी. लांबीचा सागर किनारा प्राप्त झालेला आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन पालघर हा ३६ वा जिल्हा निर्माण करण्यात आला. भूक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. राजस्थानचे क्षेत्रफळ देशात सर्वाधिक असून ते ३,४२,२३९ चौ. कि. मी. आहे, तर दुस-या क्रमांकावर मध्यप्रदेश आहे. मध्यप्रदेशाचे क्षेत्रफळ ३,०८,३४६ कि.मी. आहे. भारताचे भुक्षेत्रफळ ३,२८,७२६३ चौ.कि.मी. आहे. २०११ च्या जनगणना अहवालानुसार भारताची लोकसंख्या १.२१.०१,९३,४२२ आहे, तर महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७४,३३३ आहे. त्यापैकी ५,८२,४३,०५६ पुरुष आणि ५,४१,३१,२७७ स्त्रिया आहेत.
लोकसंख्येच्या दृष्टिने भारतात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. भारतात उत्तर प्रदेशाची लोकसंख्या सर्वाधिक असून ती १९.९६ आहे. तर बिहार राज्याचा क्रमांक तिसरा लागतो. या राज्याची लोकसंख्या १०.४१ कोटी आहे.
भौगोलिक व राजकीय सीमा :-
महाराष्ट्राच्या भौगोलिक व राजकीय सीमा पुढीलप्रमाणे आहेत.
१) पूर्वेस व ईशान्येस - छत्तीसगड
२) पश्चिमेस - सिंधू सागर (अरबी समुद्र)
३) दक्षिणेस - गोवा व कर्नाटक प्रदेश
४) उत्तरेस - मध्य प्रदेश
५) आग्नेयेस - तेलंगणा राज्य
६) वायव्येस - दादर-नगर हवेली व गुजरात
महाराष्ट्राच्या वायव्य भागात सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या, उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत, तर ईशान्येस दरकेसा टेकड्या, पूर्वेस चिरोली टेकड्या व भामरागड डोंगररांगा आहेत.
दक्षिणेस पठारावर हिरण्यकेशी नदी, कोकणात तेरेखोल नदी व पश्चिमेस अरबी समुद्र अशा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत.
No comments:
Post a Comment