Wednesday, December 5, 2018

असहकार चळवळ


                     

लोकमान्य टिळकाचे १९२० साली निधन झाले आणि महात्मा गांधी यांच्याकडे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व आले.


सत्याग्रहाचा नवा मार्ग  :-   दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांची सत्ता होती. भारतातील काही लोक तेथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर आणि तेथील कृष्णवर्णीय लोकांवर ब्रिटिश राज्यकर्ते अन्याय व जुलूम करत होते. गांधीजी वकिली व्यवसाय करण्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तेथे त्यांनी भारतीयांवर होणा-या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांना संघटित केले. त्यासाठी त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला. सत्याग्रह म्हणजे जुलमाचा अहिंसक मार्गाने केलेला प्रतिकार. अन्याय करणाऱ्या  व्यक्तीचे मतपरिवर्तन करणे, यावर सत्याग्रहाचा भर होता. सत्याग्रहाच्या मार्गाने दक्षिण आफ्रिकेतील लोकांना गांधीजींनी न्याय मिळवून दिला.

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून १९१५ साली भारतात परत आले. ब्रिटिश राजवटीत भारतीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने चळवळ चालवण्याचे ठरवले.

गांधीजींनी प्रथम बिहारमधील चंपारण्यातील शेतक-यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. तेथील शेतक-यांना नीळ पीकवण्याची सक्ती ब्रिटिश मळेवाले करत असते.
  महात्मा गांधी  
                                            
या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला. ब्रिटिश मळेवाल्यांच्या त्रासातून शेतक-यांची  सुटका झाली.

गुजरातमधील खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. तरीही ब्रिटिश सरकार शेतसारा सक्तीने वसूल करत होते. गांधीजींच्या प्रोत्साहनाने  शेतक-यांनी या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने लढा चालवला. अखेरीस सरकारने शेतसारा माफ केला.

रौलट कायदा :- ब्रिटिश सरकारने भारतीयांना सुधारणा कायद्याने काही हक्क दिले, पण त्याचवेळी भारतीयांना दडपून टाकण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला. त्यासाठी सरकारने रौलट कायदा केला. हा कायदा अत्यंत जुलमी स्वरूपाचा होता. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला देण्यात आला. याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. या कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींच्या आवाहनानुसार देशभर हरताळ पाळण्यात आला. हे आंदोलन सरकारने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.

जालियनवाला बाग हत्याकांड :- अमृतसर येथे हरताळ केल्यामुळे डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना सरकारने हद्दपार केले. या हद्दपारीच्या निषेधार्थ अमृतसर येथील जालियनवाला बागेत एक मोठी सभा भरली होती. त्या वेळी जनरल डायर या लष्करी अधिका-याने आपल्या सैन्याला गोळीबार करण्याचा आदेश दिला . गोळीबारात चारशेपेक्षा जास्त लोक ठार झाले व हजारो जखमी झाले या घटनेनंतर पंजाबमध्ये ब्रिटिशांनी भयंकर अत्याचार सुरू केले अत्याचाराच्या बातम्या वणव्यासारख्या देशभर पसरल्या. त्यामुळे  सगळीकडे  संतापाची लाट उसळली. या अत्याचाराचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेला ‘सर' हा बहुमानाचा किताब सरकारला परत केला.

खिलाफत चळवळ :-  तुर्कस्तानच्या सुलतानास ‘खलीफा' म्हणत.
जगातील सर्व मुस्लिम त्याला आपला धर्मप्रमुख मानत असत.तुर्कस्तानने   इंगलंडच्या विरुद्ध पहिल्या महायुद्धात भाग घेतला. भारतातील मुस्लिमांचे युदधात सहकार्य मिळवण्यासाठी खलीफाच्या सत्तेला आपण धक्का लावणार नाही, असे आश्वासन ब्रिटिशांनी भारतीय मुस्लिमांना दिले होते, मात्र दिलेले आश्वासन इंग्रजांनी पाळले नाही. युद्ध संपताच त्यांनी तुर्की साम्राज्याचे तुकडे केले आणि त्याचे काही भाग आपल्या ताब्यात घेतले. यामुळे भारतातील मुस्लिम संतापले. इंग्रजांच्या विरोधात खलीफाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जी चळवळ सुरू केली तिला ‘खिलाफत चळवळ' असे म्हणतात. राष्ट्रीय सभेने या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. याला प्रतिसाद म्हणून खिलाफत चळवळीच्या नेत्यांनी असहकार चळवळीला पाठिंबा दिला.

असहकार चळवळ :- ब्रिटिशांशी असहकार केला, तर ब्रिटिश एक दिवसही राज्यकारभार चालवू शकणार नाहीत, असे गांधीजींचे मत होते. त्यासाठी राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम मंजूर केला  ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या, मानसन्मान नाकारायचे, सरकारी शाळामहाविद्यालयांमध्ये जायचे नाही, परदेशी मालावर बहिष्कार घालायचा, वकिलांनी सरकारी न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकायचा, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
असहकार आंदोलनाबरोबरच गांधीजींनी अस्पृश्यता नष्ट करणे, हिंदू  मुस्लीम  ऐक्य घडवून आणणे, दारूबंदी असा विधायक कार्यक्रम हाती घेतला.

असहकार चळवळीला देशभर प्रतिसाद मिळाला. विद्यार्थानी  सरकारी शाळांतून नावे काढली व राष्ट्रीय शाळांमध्ये प्रवेश घेतला.  अनेकांनी वकिली करण्याचे नाकारले. लोकांनी परदेशी कापडाच्या होळ्या केल्या. डॉ. राजेंद्रप्रसाद, वल्लभभाई पटेल इत्यादी नेत्यांनी या चळवळीत भाग घेतला. या चळवळीत स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता.
असहकार चळवळीचा जोर जसजसा वाढत गेला तसतशी सरकारची दडपशाही वाढत गेली. उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे सत्याग्रहींनी शांततापूर्ण मिरवणूक काढली. या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीहल्ला केला, म्हणून चिडून आंदोलकांनी पोलीस चौकीला आग लावली. या आगीत काही पोलींस मृत्युमुखी पडले. असहकार चळवळीला हिंसक वळण लागणे गांधीजींना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी ही चळवळ थांबवली. तरीही सरकारने गांधीजींना अटक केली. असहकार चळवळ थांबली, तरी देशात अनेक ठिकाणी सत्याग्रहाच्या घटना घडत होत्या. अशा सत्याग्रहांना सरकार दाद देत नव्हते; म्हणून मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नेत्यांना कायदेमंडळात निवडून जावे व तेथे सरकारच्या दडपशाहीला विरोध करावा असे वाटले. यासाठी त्यांनी स्वराज्य पक्ष' स्थापन केला. त्यांनी कायदेमंडळात सरकारच्या अन्याय्य धोरणांना विरोध केला.

सायमन कमिशन :- ब्रिटिशांनी भारतास दिलेल्या सुधारणांची अंमलबजावणी कितपत झाली, हे पाहण्यासाठी इंग्लंडहून एक समिती भारतात आली. सर जॉन सायमन हे या समितीचे अध्यक्ष होते, म्हणून या समितीला सायमन कमिशन असे म्हणतात. या समितीत एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, त्यामुळे राष्ट्रीय सभेने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला  देशभर या कमिशनला काळे  झेंडे दाखवून त्याचा निषेध करण्यात आला . जेथे जेथे सायमन कमिशन गेले. त्या त्या ठिकाणी ‘सायमन परत जा' अशा घोषणा देण्यात आल्या. लाहोर येथे सायमन कमिशनविरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. पुढे त्यातच त्यांचा अंत झाला.

लाला लजपतराय
                                                   
लाला लजपतराय
लाला लजपतराय हे निष्णात वकील होते. ते वंदे मातरम' व 'पंजाबी दैनिकांतून लेखन करत. त्यांनी 'पीपल' नावाचे इंग्रजी मासिक सुरू केले होते. लाल लजपतराय यांनी 'यंग इंडिया’, ‘महान अशोक', 'छत्रपती शिवाजी' इत्यादी पस्तके लिहिली.





राष्ट्रीय चळवळीची वाटचाल


                  


लॉर्ड कर्झन याने इ. स. १९०५ मध्ये बंगाल प्रांताची फाळणी केली बंगाल प्रांताचा विस्तार मोठा असल्याने प्रशासकीय सोईसाठी फाळीनी  केल्याचे कारण देण्यात आले. परंतु त्यामागील खरा हेतू हिंदू  व मुस्लीम समाजात फुट  पाडून  राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे हा होता बहुसंख्य असलेला पूर्व बंगाल व हिंदू बहसंख्य असलेला बिहार व आरिसा मिळून बनलेला पश्चिम बंगाल असे दोन प्रांत निर्माण करण्यात आले राष्ट्रीय सभेने बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला.

वंग-भंग आंदोलन :- बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंग-भंग आंदोलन असे म्हणतात. या आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले. फाळणीविरुद्ध तीन आंदोलन झाले तरीही ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी रद्द केली नाही. उलट आंदोलकांविरुद्ध दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब केला.आंदोलकांवर लाठीहल्ले केले. वंग-भंग चळवळीत 'वंदे मातरम्' हे आंदोलकांचे घोषगीत होते. हे गीत म्हणणाच्या शाळकरी मुलांनाही शिक्षा करण्यात आल्या.

बंगालच्या फाळणीविरुद्ध देशभर  आंदोलन करण्यात आले.दादाभाई  नौरोजींनी भारतीयांना ‘अखंड चळवळ करा' असा संदेश दिला राष्ट्रीय सभेने स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण असा आंदोलनाचा चारसूत्री कार्यक्रम जाहीर केला.


 दादाभाई नौरोजी


राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी सरकारने 'फोडा आणि राज्य करा या धोरणाचा  अवलंब केला. हिंदू, मुसलमान यात फुट पाडण्याचा प्रयत्न केला.
यातून १९०६ साली मुस्लिम लीग' या संघटनेची स्थापना झाली. राष्ट्रीय आंदोलनाची वाढती शक्ती कमी करण्यासाठी सरकारने भील प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबले. इ. स. १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांना  अटक करण्यात आली. त्यांना सहा वर्षांची कारावासाची शिक्षा देण्यात  आली. लोकमान्य टिळकांना झालेल्या शिक्षेमुळे देशभर संतापाची लाट उसळली. मुंबई येथील गिरणी कामगारांनी त्या शिक्षेच्या विरोधात सहा दिवस  संप केला. जहाल नेत्यांनी चारसूत्री कार्यक्रम भारतभर पोचवला. वंग भंगाचे आंदोलन उग्र होत गेले. अखेर राष्ट्रीय सभेच्या आंदोलनापुढे सरकार नमले  सरकारने बंगालची फाळणी १९११ साली रद्द केली.

होमरूल चळवळ :-  डॉ. अॅनी बेझंट या आयरिश विदुषीने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भारतीयांना स्वराज्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली. यासाठी त्यांनी चेन्नई येथे होमरूल लीगची म्हणजे स्वराज्य संघाची स्थापना केली. या धर्तीवर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात स्वराज्य संघाची स्थापना केली. स्वराज्य संघाच्या चळवळीला सामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला. अनेक स्त्रिया या चळवळीत सहभागी झाल्या. या चळवळीने देशभर चैतन्य निर्माण झाले.
राष्ट्रीय सभेचे १९१६ साली लखनऊ येथे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात स्वराज्याची मागणी करण्यात आली. भारतीयांमधील असंतोष काही  प्रमाणात कमी करणे सरकारला गरजेचे वाटू लागले, म्हणून सरकारने १९१९ साली सुधारणा कायदा मंजूर केला.

  डॉ. अॅनी बेझंट



Saturday, December 1, 2018

राष्ट्रीय सभेची स्थापना



 
राष्ट्रीय जागृती होऊ लागल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतील राजकीय चळवळी सरू झाल्या होत्या. त्याला अखिल भारतीय स्वरूप  देण्याचे प्रयत्नही या काळात सुरू झाले. इंडिअन  असोसेशिअन  संघटनेने  कोलकता येथे अखिल भारतीय परिषद भरवली. या प्रयत्नात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली.

दादाभाई नौरोजी, बदृदिन  तय्यबजी, फिरोजशहा मेहता इत्याही भारतीय नेत्यांना असे वाटू लागले, की राष्ट्रीय पातळीवर एखादी संघटन असावी. त्यांनी निवृत्त ब्रिटिश अधिकारी सर अॅलन् हयूम याच्या सहकार्याने इंडियन नॅशनल काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली.

 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन : राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे भरले होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा  मेहता, पी. रंगय्या नायडू, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी नेते त्यात सहभागी होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. अधिवेशनात देशापुढील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. या पुढील काळात राष्ट्रीय सभेची अधिवेशने प्रत्येक वर्षी निरनिराळ्या शहरांत भरू लागली. राष्ट्रीय सभेला लोकांचा पाठिंबा वाढत गेला. सर्व धर्माच्या लोकांना राष्ट्रीय चळवळीत एकत्र आणण्याचा राष्ट्रीय सभेचा प्रयत्न होता.      

व्योमेशचंद्र बॅनर्जी
 
भारतीयांची ही एकजूट ब्रिटिश सरकारला धोकादायक वाटू लागली  शासकीय सेवेत असलेल्या भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या सभांना हजर राहू नये, असा नियम सरकारने केला. मुस्लिम समाजाने राष्ट्रीय सभेत सहभागी होणे त्यांच्या हिताचे नाही, असा प्रचार ब्रिटिशांनी सुरू केला; परंतु याचा फारसा परिणाम बद्रदुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांवर झाला नाही. ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांची होणारी पिळवणूक आणि त्यांचे वाढते दारिद्र्य यांवर राष्ट्रीय सभेने आपले लक्ष केंद्रित केले. सरकारी नोक-यांत भारतीयांना स्थान मिळावे, शेतक-यांवरील कराचा बोजा कमी करावा, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या.

मवाळ व जहाल गट :- राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या काळात तिचे नेतृत्व पूर्णपणे नेमस्तांच्या म्हणजे मवाळांच्या हाती होते. सरकारला निवेदने, अर्ज-विनंत्या केल्यास ते आपल्या मागण्या मान्य करेल, यावर त्यांचा विश्वास होता. सनदशीर मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. गोपाळ कृष्ण गोखले हे नेमस्तांचे अग्रणी होते.

   गोपाळ कृष्ण गोखले
                  
अर्ज-विनंत्यांचा विचार करून ब्रिटिश सरकार भारतीयांच्या मागण्या मान्य करेल, ही भारतीयांची आशा फोल ठरली. त्यामुळे राष्ट्रीय सभेतील काही तरुण अस्वस्थ होऊ लागले. नेमस्तांच्या मार्गाने जाऊन राजकीय चळवळ पुढे नेता येणार नाही, असे त्यांना वाटू लागले. केवळ अर्ज विनंत्या  करून भागणार नाही, तर समाजातील सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे, स्वराज्यासाठी प्रखर देशभक्ती निर्माण झाली पाहिजे जनतेने आपले हक्क संघटित होऊन, झगडून  मिळवले पाहिजेत, यावर  त्यांचा विश्वास होता. अशी विचारसरणी असणा-यांना ‘जहाल असे म्हणतात. अशा तरुणांचे नेतृत्व लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी केले.

लोकमान्य टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांतून ते भारतीय जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देऊ लागले. सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत   केली आपल्या लिखाणातून व भाषणांतून लोकांना निर्भय व स्वाभिमानी बनण्यास शिकवले.

लोकमान्य टिळक
            
   अधिवेशनाचे ठिकाण अध्यक्ष व वर्ष 

१.व्योमेशचंद्र बॅनर्जी  - मुंबई -१८८५

२. दादाभाई नौरोजी  - कोलकता - १८८६

३. बदुद्दीन तय्यबजी - चेन्नई   - १८८७

४.सर विल्यम वेडरबर्न - मुंबई  - १८८९

५. जॉर्ज युल  - अलाहाबाद  - १८८८



Featured post

क्रांतियुग

समाजजीवनाच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात , अशा बदलांना क्रांती ...