Thursday, November 29, 2018

१८५७ चा राष्ट्रीय उठाव



           

आधुनिक भारताच्या इतिहासातील १८५७ चा राष्ट्रीय उठवातील महत्त्वाची घटना. इंग्रज राज्यकर्त्यांविरुद्ध जनता व सैनिक यांच्या मनात असंतोष होता. या असंतोषाचा उद्रेक म्हणजे १८५७ चा राष्ट्रीय उठाव होय.

जनतेतील असंतोष :- दारिद्र्य आणि बेकारी यांमुळे देशातील लोक गांजून गेले होते. शेतक-यांवरील कराचा बोजा वाढल्यामुळे शेतकरी असंतुष्ट होते. इंग्रजांनी काही राजेरजवाड्यांची संस्थाने म्हणजे त्यांची राज्ये खालसा केली. काहींचे तनखे बंद केले. संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक, कारागीर इत्यादी बेकार झाले. इंग्रजांनी भारतात काही सामाजिक सुधारणा केल्या. सतीची चाल बंद  केली. विधवा विवाहास मान्यता दिली. असे कायदे करून इंग्रज सरकार आपल्या धर्मात हस्तक्षेप करत आहे, असे लोकांना वाटू लागले.
 
सैनिकांतील असंतोष :- इंग्रजांच्या लष्करातील भारतीय सैनिकांना भेदभावाची वागणूक मिळत होती. त्यांना इंग्रज सैनिकांपेक्षा कमी पगार मिळे. बढतीही नाकारली जात असे. लढण्यासाठी भारताबाहेर जाण्याची त्यांच्यावर सक्ती केली जात असे. इंग्रज अधिकारी त्यांची मानहानी करत. सैनिकांनी कपाळाला गंध लावू नये, दाढीमिश्या ठेवू नयेत असे नियम करण्यात आले होते. अशा नियमांमुळे सैनिकांत असंतोष पसरला होता. नव्या प्रकारच्या बंदुका सैनिकांना देण्यात आल्या. या बंदुकांत वापरायची काडतुसे ज्या आवरणात गुंडाळलेली असत, ती आवरणे सैनिकांना दातांनी तोडावी लागत. या आवरणांना गाय व डुक्कर यांची चरबी लावलेली आहे. या बातमीमुळे भारतीय सैनिकांच्या भावना दुखावल्या. अशा अनेक कारणांमुळे सर्वत्र असंतोष धुमसत होता.

उठावाचा भडका :- बंगाल प्रांतातील बराकपूर येथील लष्करी छावणीत २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडे या सैनिकाने इंग्रज अधिकान्यावर गोळी झाडली. पुढे त्यांना फाशी देण्यात आले. यामुळे उठावाचा भडका उडाला.
 
 उठावाची वाटचाल :- मंगल पांडे यांच्या हौतात्म्याने भारतीय शिपायांना लढण्याची प्रेरणा मिळाली. मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटणच १० मे १८५७ रोजी बंड करून उठली. त्यांनी इंग्रज अधिका-यांचे हुकूम उघडपणे झिडकारले. मुघल बादशाहा बहादुरशहा यांना इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी सैनिक दिल्लीकडे निघाले. दिल्लीस जात असताना वाटेत त्यांना ठिकठिकाणच्या लष्करी छावण्यांतले सैनिक सामील झाले. त्यांनी दिल्ली काबीज केली. भारताचा बादशाहा म्हणून बहादुरशहा याना गादीवर बसवले. यानंतर सशस्त्र उठावाचा वणवा उत्तर भारतात अन्य ठिकाणी पसरला. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येची बेगम हजरतमहल, बिहारमधील जमीनदार कुंवरसिंह, मौलवी  अहमदउल्ला यांनी आपापल्या प्रदेशात उठावाचे नेतृत्व केले.         
बहादुरशहा
           
         
राणी लक्ष्मीबाई
                                                                      


नानासाहेब पेशवे
                                                   
दक्षिण भारतातही उठाव झाले. कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिल्लांनी मोठा उठाव केला. औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नागपूर इत्यादी ठिकाणी उठाव झाले. १८५७ च्या उठावात हिंदू, मुसलमान एकजुटीने लढले. सामान्य जनता, जहागीरदार यांनी उठावाला साथ दिली.

उठावाचा शेवट :- उठावातील नेत्यांपैकी कुंवरसिंह, मौलवी अहमदउल्ला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे धारातीर्थी पडले. मुघल बादशाहा बहादुरशहा यांना इंग्रजांनी तुरुंगात टाकले. नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरतमहल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तात्या टोपे इंग्रजांच्या हाती सापडले. त्यांना फाशी देण्यात आले.

हा उठाव जवळजवळ वर्षभर चालू होता. भारतीय सैन्य शौर्य, धैर्य , यांत कमी नव्हते. तरीही या उठावात त्यांना अपयश आले. याचे कारण इंग्रजांनी या उठावास अत्यंत योजनाबद्ध रीतीने व खंबीरपणे तोंड दिले. इंग्रजांच्या सैन्यातील शिस्त उत्तम होती. लष्करी हालचालींत एकसूत्रता होती. इंग्रजांकडे दळणवळणाची आधुनिक साधने व शस्त्रे होती.

उठावाचे परिणाम :- १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील सत्तेचा शेवट झाला. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला. तिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. भारतीयांच्या रूढी, चालीरीती आणि धर्म यांत इंग्रज हस्तक्षेप करणार नाहीत, तसेच संस्थानिकांची राज्ये खालसा केली जाणार नाहीत, असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले.

कुवरसिंह

    
बेगम हजरतमहल


तात्या टोपे


  





  
     



Monday, November 26, 2018

महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास

                             
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्र राज्याला प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान  वारसा  मिळाला आहे .या राज्यावर सातवाहन, वाकाटक , बदामीचे चालुक्य घराणे, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे  यादव ,शिलाहार ,मुस्लीम आणि मरठी राज्यकर्तयनी राज्य केले. महाराष्ट्रच्या जडणघडनित आणि सामाजिक संस्कृतीक विकासात   या राज्यघराण्याचे      योगदान उल्लेखनीय ठरते. त्याचाच आढावा प्रस्तुत प्रकरणात घेतला आहे.




भौगोलिक स्थान  स्थिती :-
भारतीय संघराज्यात २९ घटकराज्ये व ७ केद्रशासीत प्रदेश आहेत. २ जुन २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याच्या विभाजनातून तेलंगणा  है - २९  वे राज्य निर्माण झाले. २९ घटक राज्यापैकीच महाराष्ट्र हे एक घटकराज्य आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली  भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग महाराष्ट्र पठार म्हणजेच दख्खन पठार आहे. महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे .

 या राज्याचा सर्वसाधारण भौगोलिक आकार त्रिकोणाकृती असून  दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद होत गेलेला आहे. त्याचा पाया  कोकणात  आणि त्याचे निमुळते टोक पूर्वेस गोंदियाकडे आहे. हे राज्य १५° ४४ ते २२° ०६° उत्तर अक्षांश आणि ७२° ३६ ते ८०° ५४' पूर्व रेखांश पसरले आहे.

क्षेत्रफळ व लोकसंख्या :-
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे, ३५८ तालुके, ३७८ नगरे व ४३,७११ खेडी आहेत. महाराष्ट्र या राज्याचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.कि.मी. ने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९.३६ टक्के आहे. या राज्याची पूर्व - पश्चिम लांबी ८०० कि. मी. तर उत्तर - दक्षिण लांबी ७२० आहे. या राज्यास ७२० कि. मी. लांबीचा सागर किनारा प्राप्त झालेला आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन पालघर हा ३६ वा जिल्हा निर्माण करण्यात आला. भूक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. राजस्थानचे क्षेत्रफळ देशात सर्वाधिक असून ते ३,४२,२३९ चौ. कि. मी. आहे, तर दुस-या क्रमांकावर मध्यप्रदेश आहे. मध्यप्रदेशाचे क्षेत्रफळ ३,०८,३४६ कि.मी. आहे. भारताचे भुक्षेत्रफळ ३,२८,७२६३ चौ.कि.मी. आहे. २०११ च्या जनगणना अहवालानुसार भारताची लोकसंख्या १.२१.०१,९३,४२२ आहे, तर महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७४,३३३ आहे. त्यापैकी ५,८२,४३,०५६ पुरुष आणि ५,४१,३१,२७७ स्त्रिया आहेत.

लोकसंख्येच्या दृष्टिने भारतात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. भारतात उत्तर प्रदेशाची लोकसंख्या सर्वाधिक असून ती १९.९६ आहे. तर बिहार राज्याचा क्रमांक तिसरा लागतो. या राज्याची लोकसंख्या १०.४१ कोटी आहे.

 भौगोलिक व राजकीय सीमा :-


महाराष्ट्राच्या भौगोलिक व राजकीय सीमा पुढीलप्रमाणे आहेत.

१) पूर्वेस व ईशान्येस - छत्तीसगड
२) पश्चिमेस - सिंधू सागर (अरबी समुद्र)
३) दक्षिणेस - गोवा व कर्नाटक प्रदेश
 ४) उत्तरेस - मध्य प्रदेश  
५) आग्नेयेस - तेलंगणा राज्य
 ६) वायव्येस - दादर-नगर हवेली व गुजरात

महाराष्ट्राच्या वायव्य भागात सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या, उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा  व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत, तर ईशान्येस दरकेसा टेकड्या, पूर्वेस चिरोली टेकड्या व भामरागड डोंगररांगा आहेत.

दक्षिणेस  पठारावर हिरण्यकेशी नदी, कोकणात तेरेखोल नदी व पश्चिमेस अरबी समुद्र अशा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत.



Featured post

क्रांतियुग

समाजजीवनाच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , आर्थिक अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात , अशा बदलांना क्रांती ...